बापाने स्वतःच्या मुलाला केले नपुंसक; त्यानंतर सुनेसोबत केले ‘हे’ कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बरेली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील बरेली गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बरेली गावातील एक २८ वर्षीय महिलेने आपल्या सासऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिने जेव्हा पोलिसांना घडलेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा पोलीस देखील हैराण झाले. तिने आपल्या तक्रारीत सासऱ्याने स्वतःच्याच मुलाला नपुंसक बनवून माझ्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

काय आहे प्रकरण
आरोपी सासऱ्याने आपल्या सुनेवर ताबा मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले. आपल्यावर वाईट नजर ठेवून असल्याचे कृत्य जर आपल्या नवऱ्याला सांगितले तर तो आपल्यावर भरोसा नाही ठेवणार म्हणून तिने नवऱ्याला यातले काही सांगितले नाही. सुनेवर आपल्याला ताबा मिळवता येत नसल्याने सासऱ्याने खालच्या थराचे कृत्य करत बाप आणि मुलगा यांच्या नात्याला काळिमा फासला आहे. यामध्ये सासऱ्याने स्वतःच्याच मुलाला नपुंसक करण्यासाठी गोळ्या देण्यास सुरुवात केली. यानंतर सासऱ्याने स्वतःच्याच सुनेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.

काही दिवसांनंतर पीडित महिलेला हा त्रास सहन झाला नाही यानंतर तिने पोलीस स्टेशनला जाऊन सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. सासऱ्यावर गुन्हा दाखल केला पण त्या महिलेला अजून न्याय मिळाला नाही आहे. कारण जेव्हा सासऱ्याला समजले कि सून आपल्यावर गुन्हा दाखल करणार आहे तेव्हा त्यांनी सुनेला घरातून हाकलून लावले आणि सुनेचे चारित्र ठिक नसल्याचे सांगत स्व:ताचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.