राष्ट्रपिता बापूजींचा चष्मा गायब ? कराड शहर पोलिस ठाण्यात कारवाईसाठी अर्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहराच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या कोल्हापूर नाका येथे असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चष्मा गायब झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गोंधळ करणाऱ्या एकाला कराड शहर पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. मात्र चष्माच्या शोध घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व दक्ष कराड ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात कारवाईसाठी अर्ज दिला असून लवकरात लवकर यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

कराड शहरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला अनन्य साधारण महत्व आहे. कारण कोणताही मोठा राजकीय, सामाजिक व्यक्ती ही प्रथम कराड शहरात येताना या पुतळ्याला अभिवादन करते. तसेच आंदोलनाची सुरूवात असो की निदर्शने असो लक्ष वेधण्यासाठीचे राजकीय लोकाचे ठिकाण म्हणजे गांधीजीचा पुतळा हे होय.

कराड नगरपालिकेच्या हद्दीत हा पुतळा आहे. मात्र अनेकदा पुतळ्याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. शनिवारी 17 जुलै रोजी सकाळी या पुतळ्याचा चष्माच गायब झाला असून शोधण्यासाठी अर्ज देण्यात आला आहे. यावेळी कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याशी चर्चाही केली आहे.

विटबंना टाळण्यासाठी सीसीटीव्ही बसवावे ः प्रमोद पाटील

कराड शहरात चाैका- चाैकात पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या पुतळ्यापासून लोकांना इतिहास माहीत व्हावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. मात्र सामाजिक सलोख्या राखण्यासाठी या पुतळ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच या पुतळ्याची विटबंना टाळण्यासाठी सीसीटीव्ही बसवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी केलेली आहे.

काॅंग्रेसचेही दरवाढ विरोधातील आंदोलन महात्मा गांधी पुतळ्याजवळ

केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधातील स्वाक्षरी व सायकल रॅली ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून सुरू करण्यात आली. रॅलीचा शुभारंभ महात्मा गांधी यांना पुष्पहारही घालून अभिवादन करण्यात आले. परंतु काॅंग्रेसच्या कोणत्याही नेत्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या गांधीचा चष्मा नसल्याचे लक्षात आले नाही.

You might also like