औरंगाबाद : पोटच्या तेरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पित्याला विविध कलमाखाली पाच वर्ष सक्तमजुरी व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश चौधरी यांनी सुनावली.या प्रकरणातील पीडिताही फुलंब्री तालुक्यातील आहे.
ही घटना 7 एप्रिल 2020 रोजी घडली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात पीत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे पीडित मुलीचा रिक्षाचालक पिता हा घरीच होता. आई शेतीत कामाला गेल्यानंतर पिता पीडितेशी लगट करायचा.रात्रीजवळ येऊन अश्लील स्पर्श करायचा. त्याची माहिती पीडित मुलीने आईला दिल्यानंतर पित्याने पीडितेसह तिच्या आईला चाकू दाखवून धमकी दिली व घरातून निघून गेला.
या संदर्भातील तक्रार दाखल झाल्यानंतर फुलंब्रीचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी दोषारोपपत्र दाखल केले. विशेष जिल्हा सरकारी वकील सुरेश सिरसाट यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले.फिर्यादी तिची आई व मुख्याध्यापक यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला वरील शिक्षा सुनावली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group