आता होम आयसोलेशनला परवानगी, पण काही अटींवर- अस्तिक कुमार पांडेय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर जात असल्याने महानगरपालिकेने आता होम आयसुलेशन चा पर्याय पुढे आणला आहे. साठ वर्षाखालील व कमी लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींचे होम आयसोलेशन घरातच विलगीकरण करण्याचे आदेश प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत.

प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, साठ वर्षाखालील ज्या व्यक्तींना होम आयसोलेशनची सुविधा हवी आहे. त्यांना फिजिशियनने केलेल्या शिफारशी शिवाय ही सुविधा मिळणार नाही. कोऑब्रीट आजार नसलेल्या (मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर, किडनी, आधी स्वरूपाचे आजार) व्यक्तींना होम आयसोल्युशन करण्यात यावे. सौम्य किंवा लक्षणें असलेल्या व्यक्तींनी खासगी वैद्यकीय व्यवसायिक (फिजीशियन) एम.डी. (मेडिसिन) यांच्या अधिपत्याखालील उपचार घेण्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे.

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांच्या आवश्यकतेनुसार प्राथमिक तपासणी (रक्त तपासणी, एक्स-रे व इतर तपासणी) आवश्यकतेनुसार करावी. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी गरजेनुसार रुग्णास रुग्णालयात भरती करावे. त्यांची संपूर्ण जबाबदारी खासगी वैद्यकीय व्यवसायिकांची असणार आहे. रुग्णास दहा दिवस देखरेख आवश्यक असेल व्हिडिओ कॉल फोन द्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून उपचार करू शकतात असे प्रशासकांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment