फादर्सडेला जन्मदात्यांना बेदम मारहाण; दुर्दैवाने आईचा मृत्यू

Beating parents
Beating parents
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड | काल फादर्सडेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात वडिलांबद्दलच प्रेम व्यक्त केले जात होते. त्यांचे आभार मांडण्यात आले. पण याला अपवाद बीड मध्ये एका मुलाने आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण केली. हा मारहाण करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव येथे मुलाने आपल्या आई-वडिलांना काठीने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गंभीर म्हणजे या मारहाणीत आईचा मृत्यू झाला आहे. आणि वडील नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पहा व्हिडीओ https://twitter.com/AurangabadHello/status/1406878797610164229?s=1005

प्राप्त माहितीनुसार, मारहाण करतानाच्या व्हिडीओ मधील विकृत मुलगा, बाबासाहेब खेडकर याने आपल्या आई-वडिलांना शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास काठीने बेदम मारहाण केली. हा विकृत व्यक्ती चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना मारहाण करत आहे. विशेष म्हणजे मारहाण करततानाचा व्हिडिओ गावातीलच एका व्यक्तीने शूट केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर आला आहे. या बाबत अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही.

असे कृत्य तो सतत अधून मधून करत असतो असे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर हिचा मृत्यू झाला आहे. तर वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बीडचे पोलिस अधिक्षक आर. राजा यांना विचारले असता ते म्हणाले की, व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार खेदजनकच आहे.