Thursday, March 23, 2023

चीनने पाठवलेल्या ‘बोगस’ रॅपिड टेस्ट किट भारत परत करणार- केंद्रीय आरोग्य मंत्री

- Advertisement -

नवी दिल्ली । चीनकडून आयात करण्यात आलेल्या ‘रॅपिड टेस्टिंग किट’ चुकीचा निकाल देत असल्यानं अशा बोगस किट चीनला परत पाठवण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला. आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या साहाय्यानं सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांशी राज्यांच्या संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या टेस्ट किट ज्या देशातून आयात करण्यात आल्या त्यांनाच परत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. चीननं धाडलेल्या रॅपिड टेस्ट किट ‘डुप्लीकेट’ निघाल्यानं त्याचा वापर थांबवण्याचे आदेश आयएमसीआरनं राज्यांना दिले होते.

चीनमधून आयात केलेल्या ‘रॅपिड टेस्ट किट’ चुकीचा निकाल देत असल्याची सर्वात आधी तक्रार राजस्थान सरकारने केली होती. त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात अशा अनेक राज्यांतून तक्रारी आल्यानंतर या टेस्ट किटचा वापर रोखण्यात आला. त्यानंतर ‘आयएमसीआर’नंही (Indian Council of Medical Research) या टेस्ट किटचा वापर थांबवण्याचे आदेश इतर राज्यांना दिले.

- Advertisement -

दरम्यान, सर्व बोगस टेस्ट किट चीनला परत पाठवण्यात येणार आहेत. भारतीय मानदंडांवर या टेस्ट किट फोल ठरल्या. आत्तापर्यंत या टेस्ट किटचं पेमेन्ट बाकी आहे. त्यासाठी आत्तापर्यंत एक रुपयाही देण्यात आलेला नाही. चीनी कंपन्यांच्या टेस्ट किटवर अनेक देशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. युरोपकडून अगोदरच चीनच्या या टेस्ट किटवर बंदी घालण्यात आलीय. तसंच खात्रीलायक निकाल न मिळाल्यानं जवळपास २० लाख किट चीनला परत पाठवले आहेत.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”