FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी एफडीवर देत आहे बँकांपेक्षा जास्त व्याज

Bank FD
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rate : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता ICICI हाउसिंग फायनान्स कंपनीने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातवाढ केली आहे.

ICICI Home Finance launches home loan festival

3 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू

हे नवीन दर 3 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. हे लक्षात घ्या कि, CRISIL, ICRA आणि CARE कडून ICICI HFC ला AAA रेटिंग मिळाले आहे. म्हणजे कंपनीच्या फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित आहेत. या कंपनी कडून क्युम्युलेटिव्ह आणि नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीची ऑफर दिली जाते. या बदलानंतर, कंपनी आता क्युम्युलेटिव्ह एफडीवर 7.50 टक्क्यांपर्यंत तर, ICICI HFC नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवर दरमहा जास्तीत जास्त 7.25 टक्के दराने व्याज देईल. FD Rate

क्युम्युलेटिव्ह पर्यायांतर्गत, ICICI HFC 12 ते 24 महिन्यांच्या FD वर 7.00 टक्के, 24 ते 36 महिन्यांच्या FD वर 7.30 टक्के आणि 36 ते 48 महिन्यांच्या FD वर 7.40 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर 7.50 टक्के व्याज देईल. FD Rate

ICICI HFC expands presence in AP, TS

नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवरील व्याजदरातही वाढ

हे लक्षात घ्या कि, या कंपनीने नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे. त्यानंतर आता कंपनी 12 ते 24 महिन्यांच्या FD वर दरमहा 6.80 टक्के दराने व्याज देईल. त्याच प्रमाणे, आता ग्राहकांना 24 ते 36 महिन्यांच्या FD वर 7.05 टक्के, 36 ते 48 महिन्यांच्या FD वर 7.15 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर 7.25 टक्के मासिक व्याज मिळेल. FD Rate

‘या’ एफडींवरही मिळेल जास्त व्याज

कंपनीने 12 ते 24 महिन्यांच्या FD वर तिमाही दराने 6.85 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता ग्राहकांना 24 ते 36 महिन्यांच्या FD वर 7.10 टक्के, 36 ते 48 महिन्यांच्या FD वर 7.20 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर 7.30 टक्के दराने व्याज मिळेल. या अंतर्गत, ICICI HFC कडून आता 12 ते 24 महिन्यांच्या नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवर वार्षिक 7.00 टक्के, 24 ते 36 महिन्यांच्या FD वर वार्षिक 7.30 टक्के, 36 ते 48 महिन्यांच्या FD वर वार्षिक 7.40 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर वार्षिक 7.50 टक्के व्याज दिले जाईल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. FD Rate

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. FD Rate

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicihfc.com/fixed-deposit/fd-interest-rate

हे पण वाचा :
Samsung Galaxy F04 : फक्त 7,499 रुपयांत मिळणार Samsung चा ‘हा’ मोबाईल; पहा फीचर्स
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळेल 1000GB डेटा
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Google Pixel 7 वर मिळवा 28,000 रुपयांपर्यंतची सूट, अशा प्रकारे घ्या ऑफरचा लाभ