हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकांनीही आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर जवळपास सर्वच कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. दरम्यान, खासगी क्षेत्रातील एक्सिस बँक आणि ICICI बँकेने मुदत फिक्स्ड डिपॉझिट्सवर म्हणजेच FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. 16 जूनपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
ICICI बँक आता 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्ससाठी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD साठी 2.75-5.75% व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना इतर नागरिकांना दिलेल्या दरापेक्षा 0.5% अतिरिक्त व्याजदराचा लाभ मिळेल. ICICI बँक 2 कोटी आणि त्याहून जास्त मात्र 5 कोटींपेक्षा कमी डिपॉझिट्सवर 3.1 ते 5.5 टक्के व्याजदर देईल. FD Rates
त्याच वेळी, एक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्सवर FD व्याजदरात वाढ केली आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक अतिरिक्त व्याजदरासाठी पात्र राहतील. 8 जून 2022 रोजी, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ जाहीर केली ज्यानंतर तो 4.90 टक्के केला. यापूर्वी, 4 मे 2022 रोजी, RBI ने रेपो दर 40 बेसिस पॉइंट्सने वाढ केला. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits
हे पण वाचा :
Multibagger Stock : दीर्घकालावधीत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
Smartphone घेताय… जरा थांबा !!! 20 हजार रुपयांखालील ‘हे’ सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन पहा
SBI चे होम लोन महागले, बँकेकडून किमान व्याजदरात वाढ !!!
Bank FD Rates : ‘या’ मोठ्या बँकांकडून FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवे दर पहा