हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र FD हा अजूनही लोकांच्या सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूकीचा पर्याय ठरला आहे. यामागील सर्वात मोठे कारण असे कि, इतर पर्यांयांच्या तुलनेत ते जास्त सुरक्षित तर आहेच त्याचबरोबर यामध्ये जोखीम देखील कमी आहे. तसेच यामध्ये अल्प ते दीर्घ मुदतीसाठी देखील गुंतवणूक करता येते. सध्या जवळपास सर्वच बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केल्याचे पहायला मिळते आहे.
जर आपल्यालाही सुरक्षित ठिकाणी गुंतवणुक करायची असेल तर FD मध्ये पैसे गुंतवता येईल. सध्या खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने ₹ 2 कोटींपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 50 bps पर्यंत वाढ केली आहे.
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 4 जानेवारी 2023 पासून हे नवीन दर लागू केले जातील. या दरवाढीनंतर बँक आता 390 दिवसांपासून ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्यांना 7% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याजदर देईल. FD Rates
कोटक महिंद्रा बँकेच्या एफडीचे दर (FD Rates)
कोटक महिंद्रा बँक आता 7 ते 14 दिवसांच्या FD वर 2.75%,15 ते 30 दिवसांच्या FD वर 3.00% 31 ते 45 दिवसांच्या FD वर 3.25%, 46 ते 90 दिवसांच्या FD वर 3.50%, 91 ते 120 दिवसांच्या FD वर 4.00% आणि 121 ते 179 दिवसांच्या FD वर 4.25% व्याजदर देईल.
त्याच प्रमाणे आता बँक 180 दिवस ते 363 दिवसांच्या FD वर 5.75%, 364 दिवसांच्या FD वर 6.00%, 365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वर 6.75%, 390 दिवस (12 महिने 25 दिवस) ते 23 महिन्यांच्या FD वर 7.00%, 23 महिने आणि एक दिवस (2 वर्षांपेक्षा कमी) च्या FD वर 7% आणि 2 वर्षांच्या (3 वर्षांपेक्षा कमी) FD वर 6.50% व्याजदर देईल.
कोटक महिंद्रा बँकेकडून 4 वर्षे किंवा त्याहून जास्त मात्र 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.25% आणि 3 वर्षे किंवा त्याहून जास्त मात्र 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.30% व्याजदर देत राहील. FD Rates
बंधन बँकेच्या FD वर मिळेल 8% व्याज
या दरम्यानच आता बंधन बँकेने देखील 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरील माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 पासून हे नवीन दर लागू होतील. यानंतर आता बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सर्वसामान्यांना 3.00% ते 5.85% आणि बिगर ज्येष्ठ नागरिकांना 3.75% ते 6.60% पर्यंतचा व्याज दर ऑफर करत आहे. त्याच प्रमाणे 600 दिवसांच्या FD वर बँक सर्वसामान्यांना 7.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 8% व्याजदर देत आहे. FD Rates
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit/fixed-deposit-interest-rate.html
हे पण वाचा :
Train Ticket : तिकीट रद्द केल्यानंतरही प्रवाशांना जीएसटी द्यावा लागेल का??? जाणून घ्या यासाठीचे नियम
TAN Card म्हणजे काय ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा आजचे दर
Auto Expo 2023 : MG मोटर घेऊन येतेय Electric हॅचबॅक कार; 450 किमी रेंज
Multibagger Stock : ‘या’आर्टिफिशियल ज्वेलरी कंपनीने 12 दिवसांत गुंतवणूकदारांना दिला चार पट नफा !!!