हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates: RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता खाजगी क्षेत्रातील कर्नाटक बँक आणि जन स्मॉल फायनान्स बँकेने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे.
1 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू
या बँकांच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार 1 डिसेंबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू होणार आहेत. या बदलानंतर आता सामान्य नागरिकांना जन स्मॉल फायनान्स बँकेकडून 2 ते 3 वर्षाच्या FD वर 8.50 टक्के तर कर्नाटक बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 5.25 टक्के ते 5.80 टक्के व्याजदर दिला जाईल. FD Rates
जन स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडीचे नवीन दर (FD Rates)
जन स्मॉल फायनान्स बँक 7-14 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के, 15-60 दिवसांच्या FD वर 3.00 टक्के, 61-90 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के, 91-180 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के व्याजदर देत आहे.
बँक 181 दिवस ते एक वर्ष (365 दिवस) मुदतीच्या FD वर 7 टक्के आणि एक वर्ष ते दोन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देत आहे. 2 ते 3 वर्षाच्या FD वर 7.55 टक्के दराने व्याज मिळेल, तर 3-5 वर्षाच्या FD वर 7.35 टक्के दराने व्याज मिळेल. जन स्मॉल फायनान्स बँकेने दिलेला व्याज दर 5 वर्षांच्या FD साठी 7.25 टक्के आणि 5-10 वर्षांच्या एफडीसाठी 6 टक्के आहे.
कर्नाटक बँकेच्या एफडीचे नवीन दर (FD Rates)
कर्नाटक बँक सध्या 7 ते 364 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के व्याज दर देत आहे. 555 दिवसांच्या FD वर 7.20 टक्के व्याजदर देत आहे. आता 2 वर्षांच्या कालावधीसह FD वर 6.80 टक्के व्याज दिले जाईल, जर ते 2-5 वर्षांच्या FD वर 5.75 टक्के दराने . कर्नाटक बँक आता 5 ते 10 वर्षांच्या FD वर 5.80 टक्के व्याज दर देत आहे. इथे हे लक्षात घ्या कि, दोन कोटी रुपयांची ही FD मॅच्युअर होणापूर्वीच बंद केली तर ग्राहकांकडून लागू दराच्या एक टक्के दंड आकारला जाईल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. FD Rates
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.janabank.com/deposits/regular-fixed-deposit/
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा