हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI कडून रेपो दरात वाढ सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यानंतर जवळपास सर्वच बँकांकडूनही आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांनी आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने देखील 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. 9 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन व्याज दर लागू झाले आहेत. बँकेने मंगळवारी सांगितले की,” आता ग्राहकांना 75 आठवडे, 75 महिने आणि 990 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 7.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना सर्व मुदतीच्या FD वर 0.75 टक्के जास्त व्याज मिळेल. FD Rates
हे लक्षात घ्या कि, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून मासिक, त्रैमासिक आणि मॅच्युरिटीवर व्याज पेमेंट पर्याय देईल. बँकेचे म्हणणे आहे की, ते आता सामान्य एफडी सारख्या कर बचतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर जास्त व्याज देतील. या टॅक्स सेव्हर एफडीचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा आहे. आता जर एखाद्याने बँकेत 75 आठवड्यांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली तर त्याला मॅच्युरिटीवर 1,11,282 रुपये मिळतील. तर दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना 75 आठवड्यांसाठी 1 लाख रुपयांच्या एफडीच्या मॅच्युरिटीवर 1,12,466 रुपये मिळतील. FD Rates
असे असतील व्याजदर
आता बँकेकडून 7 दिवस ते 29 दिवसांच्या FD वर 3.75 टक्के व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, 30 दिवस ते 89 दिवसांच्या FD वर 4.25 टक्के व्याज मिळेल. त्याच बरोबर ग्राहकांना सहा महिन्यांच्या एफडीवर 5.25 टक्के, 90 ते 179 दिवसांच्या FD वर 4.75 टक्के व्याज दिले जाईल. आता ग्राहकांना सहा महिने ते 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर वार्षिक 5.50 टक्के तर 9 महिन्यांच्या FD वर 5.75 टक्के व्याज मिळेल. FD Rates
आता ग्राहकांना 24 महिने आणि एक दिवस ते 989 दिवसांच्या FD वर 6.25 टक्के, 990 दिवसांच्या FD वर 6.50 टक्के आणि 36 महिन्यांत आणि एक दिवस ते 42 महिन्यांच्या FD वर 7.50 टक्के व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे 991 दिवसांपासून ते 36 महिन्यांच्या मुदतीच्या FD वर 6.50 टक्के, 42 महिने एक दिवस ते 60 महिन्यांच्या FD वर आता 7.20 टक्के व्याज मिळेल. तसेच 75 महिन्यांच्या FD वर 7.50 टक्के आणि 75 ते 120 महिन्यांच्या FD वर 6 टक्के व्याज मिळेल. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ujjivansfb.in/support-interst-rates
हे पण वाचा :
OLA द्वारे घरबसल्या कमवा भरपूर पैसे, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया !!!
PNB Housing Finance कडून FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा
Indusind Bank ने वाढवले FD वरील व्याजदर, जाणून घ्या किती होणार फायदा !!!
‘या’ Multibagger Stock गेल्या 15 वर्षात गुंतवणूकदारांना बनवले करोडपती !!!