घाबरू नका, कोरोना व्हायरस नाही ः बंडातात्या कराडकरांचे प्रसिध्दीपत्रकांने खळबळ

कोरोनाची कल्पना बिल गेट्सची, सरकार लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गेले वर्षभर कोरोनाचा खेळ खेळणारे सरकार आता कोरोना लस घेण्यासाठी परत एकदा कोरोनाची लाट आल्याचे नाटक करून भारतीयांची फसवणूक करून लुटत आहे. कोरोनाची कल्पना बिल गेट्सच्या डोक्यातून निर्माण झाली असून भारतासह अनेक देश बिल गेट्सची खेळणी आहेत. जगातील अनेक तज्ञ ओरडून सांगत आहेत. तरीही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा चालू आहे. त्यामुळे पुन्हा वायरस नसून दहशत आहे, असे मत ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

बंडातात्या यांनी म्हटले आहे की, भारतात प्रतिवर्षी कॅन्सरने मरणाऱ्या रुग्णांची संख्या सरकारी माहितीनुसार साडेसात ते आठ लाख आहे. दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या अडीच लाख आहे, असे असताना फक्त बनावट कोरोनाने मारणाऱ्या रुग्णांची संख्या वाढवून सांगितली जाते. तंबाखू व तंबाखूजन्य व अन्य मादक पदार्थाचे उत्पादन, विक्री व सेवनावर कोणतेही बंधन नाही. यावरून सरकार दांभिक आहे, हे सिद्ध होते.

कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे ताप, थंडी, सर्दी, कफ, खोकला असे सामान्य लक्षणे असून तो जीवघेणा रोग नाही. (मुळात कोरोनाच नाही) यावर आयुर्वेदात शेकडो उपाय आहेत. पण सरकार हे उपाय यांना प्राधान्य देत नाही. कारण ही औषधे बिल गेट्सची नाहीत. सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्सची सेवा करायची आहे. म्हणून लाॅकडाऊनचे नाटक चालू आहे. यातून जनतेचा उद्रेक झाला तर ती क्रांती असेल व झाला नाही तर दुसऱ्या पारतंत्र्याची नांदी असेल, असेही बंडातात्या कराडकर यांनी यांनी म्हटले आहे. माझे हे वैयक्तिक परखड मत असून यास कुठलाही सांप्रदाय व संघटना जबाबदार नाही.

You might also like