महाराष्ट्राला रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची केंद्राची कंपन्यांना धमकी ; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने उद्रेक केला असून कोरोना लसीच्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकार वर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिव्हर द्याल तर परवाना रद्द करण्यात येईल अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिली असल्याचे त्यांनी म्हंटल.

नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हंटल की हे खेदजनक आणि धक्कादायक आहे की जेव्हा महाराष्ट्र सरकारने 16 निर्यात कंपन्यांना # रेमडेसीविरसाठी विचारले तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की केंद्र सरकारने त्यांना महाराष्ट्रात औषध न पुरवण्यास सांगितले आहे. या कंपन्यांना चेतावणी देण्यात आली, त्यांनी तसे केल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल

हे एक धोकादायक उदाहरण आहे आणि या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या निर्यातदारांकडून रेमॅडेव्हिव्हिरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे नवाब मलिक यांनी म्हंटल. म हाराष्ट्रा सोबत दुजाभाव का असा सवाल करत देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राजकारण करू नये असा सल्ला त्यांनी केंद्राला दिला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like