हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा जपानच्या टोकियोमध्ये होऊ घातलेली ऑलिम्पिक स्पर्धा कोरोना व्हायरसच्या सावटाखाली आहे. जपानचे ऑलिम्पिक मंत्री सीको हाशिमोटो यांनी मंगळवारी जपानमध्ये होणारी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते असं म्हटलं आहे. जपानी संसदेच्या उच्च सभागृहात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की,”टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै रोजी पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार सुरू झाली नाही तर यंदाच्या वर्ष अखेरीस स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.” टोकियो ऑलिम्पिक पुढे वेगाने पसरणार्या कोरोना व्हायरसच संकट उभं राहील आहे. जपानमध्ये आतापर्यंत १२ जण कोरोनामुळं मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळं जपानमध्ये जुलैच्या शेवटी सुरु होणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलले किंवा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हाशिमोटो यांनी जपानी संसदेत या विषयावर सविस्तरपणे प्रकाश टाकत सांगितलं कि, “जर यंदाची ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन चालू वर्ष २०२० मध्ये होऊ नाही शकले तर आयओसी या स्पर्धेला स्थगिती देऊ शकते.” कारण ऑलिम्पिक स्पर्धेच्या करारानुसार ही स्पर्धा केवळ वर्ष २०२०च्या दरम्यानच आयोजित केली जाऊ शकते. आणि त्यामुळं जर कॅलेंडर वर्षानुसार स्पर्धा पार पडत नसेल तर ती पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही.” मात्र, आयओसीचे अधिकारी वारंवार सांगत आहेत कि, टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसारच केले जाईल. तर काहींच्या मते वेगाने पसरणार्या व्हायरसमुळे स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात येऊ शकतात किंवा ही स्पर्धा दुसऱ्या कुठल्या शहरात आयोजित केली जाऊ शकते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.