Poco X5 Pro 5G : Poco ने लाँच केला जबरदस्त स्मार्टफोन, तपासा किंमत अन् फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सोमवारी Poco X5 Pro 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा आणि AMOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मिड रेंज स्मार्टफोन आहे. चला तर मग त्याविषयीची माहिती जाणून घेऊयात…

Poco X5 Pro Review: For avid mobile gamers

Poco X5 Pro 5G या नवीन स्मार्टफोनमध्ये Adreno 642L GPU सहीत Snapdragon 778G प्रोसेसर आणि 8GB पर्यंत LPDDR4x रॅम देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा आहे. यासोबतच यामध्ये 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या स्मार्टफोनच्या फ्रंट साईडला 16MP कॅमेरा उपलब्ध आहे.

Poco X5 Pro 5G live shots, key specifications revealed - Gizmochina

Poco X5 Pro 5G च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 67W फास्ट चार्जिंगसहीत 5,000mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 12-बेस्ड MIUI 14 वर काम करतो. तसेच यामध्ये120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 900 nits पीक ब्राइटनेससहीत 6.67-इंचाचा Xfinity AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

New POCO X5 Pro 5G and POCO X5 5G: perfect for young people and content creators - Gearrice

फ्लिपकार्टवर या नवीन Poco X5 Pro 5G च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच हा नवीन स्मार्टफोन ब्लू, ब्लॅक आणि यलो कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच ICICI बँकेच्या ग्राहकांना यावर 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/poco-x5-pro-5g-astral-black-128-gb/p/itm1f27d5ae38ed2?pid=MOBGMDKQX7HV4MAH&affid=cashifygpro

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Pension Scheme : ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून वृद्धांना मिळेल 70 हजार रुपयांची पेन्शन, अशा प्रकारे घ्या फायदा