Sunday, April 2, 2023

कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची सूत्रे भाजपमधील ‘या’ व्यक्तीच्या हाती

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पुन्हा रंगणार आहे. तिरंगी स्वरूपात होणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. दरम्यान भाजपमधील एका बढया नेत्याने आता कसबा, पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीची सूत्री हाती घेतली आहेत.

कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीतील बढया नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच असा पण करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपमधील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दोन्ही पोटनिवडणुकीच्या सूत्रे हाती घेतली आहेत.

- Advertisement -

या निवडणुकीत आता फडणवीसांच्या आदेशानुसार प्रचार यंत्रणा राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे दोन्हीही जागा भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणायच्या आहेत. त्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.