हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन झाला आहे. यासह बॉलिवूड सेलिब्रिटी, डॉक्टर यांच्यासह सरकारही लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन करीत आहे. जेणेकरून या साथीची साखळी तोडता येईल. क्वारंटाइन ठेवण्यात आल्यामुळे आपल्याला घरातूनच काम करावे लागतंय अशा परिस्थितीत आपल्यावर खूप दबाव असू शकतो, कारण सर्व गोष्टींचे वेळापत्रक, टाइम टेबल इत्यादीसारख्या अचानक गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक ताण सहन करावा लागतो.
अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही वर्क फ्रॉम होममध्येही आरामात काम करू शकाल.
प्रेशर घेऊ नका
कामाचे अचानक प्रेशर घेऊ नका. थोडेथोडे करत काम करा. त्यामुळे आपले कामदेखील सुलभ होईल. तसेच मनावर कोणताही प्रेशर येणार नाही.
इतरांची मदत घ्या
आपल्याकडे अधिक काम असल्यास आपण एखाद्याची मदत घेऊ शकता.मदत मागण्याने कोणीही छोटा किंवा मोठा होत नाही, म्हणून आपण घरात उपस्थित असलेल्या व्यक्ती,मित्र, सहकारी यांच्याकडे मदतीची मागणी करू शकता.
सर्वकाही सुरळीत करा
कोणत्याही गोष्टीचा दबाव घेऊ नका. सर्व काही आरामात करा. प्रत्येक गोष्ट सुरळीतपणे करा. घाईघाईत आपले काम खराब होऊ शकते.
आधीपासूनच तयारी करा
जर आपण कामासाठी बसणार असाल तर पहिल्यांदा सर्वकाही तयार करा. आपल्याला काय पाहिजे हे सर्व ठेवा जेणेकरुन आपल्याला काम करताना त्रास सहन करावा लागणार नाही आणि आपले मन शांत राहील.
विश्रांती घ्या
सतत काम करणे टाळा. दरम्यान थोडा थोडा ब्रेक घेत रहा. स्वतःसाठी चहा, जेवण किंवा २ मिनिटे विश्रांतीसाठी काढा. वेळापत्रकात झालेल्या ब्रेकलाही महत्त्व द्या. जेणेकरून आपल्या मेंदूला शांत होण्याची संधी मिळेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.