पॅकेजिंग, शिपिंग आणि वितरण कामगारांचे आभार मानण्यासाठी गुगलने बनविला खास डूडल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रसार जगभर झाला आहे. विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारतात ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. पॅकेजिंग आणि शिपिंग उद्योगातील लोक अजूनही मात्र लॉकडाऊनमध्ये लोकांना आवश्यक वस्तू देण्यासाठी काम करीत आहेत. या लोकांच्या मदतीने लॉकडाऊनमध्येही लोकांची कामं अत्यंत सुरळीत आणि जीवन सोपे झाले आहे.या लोकांना धन्यवाद देण्यासाठी गुगलने एक खास डूडल तयार केले आहे.

गूगलवर एक खास हृदय बनवलेला दिसत आहे.ज्याच्या साठी टॅगलाइन लिहिलेली आहे.पॅकेजिंग, शिपिंग आणि वितरण कामगारांचे आभार.

 

गुगलने कोरोनाच्या लढाईत आपले जीवन धोक्यात घालून गुंतलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानण्यासाठीही एक विशेष डूडल बनवले आहे.

कोरोना विषाणूमुळे भारतामध्ये आतापर्यंत ११ हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, तर ३५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांना याचा संसर्ग झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment