हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | नवरा बायकोची भांडणं तशी काही नवीन नाहीत. लाॅकडाऊनमध्ये तर अशा भांडणांचं प्रमाण मोठ्या प्रामाणात वाढलंय. पण उत्तर प्रदेशातील एक जोडप्याचं भांडन सध्या चर्चेचा विषय झालं आहे. बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीनं थेट टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुरादाबाद येथे समोर आलाय. पोलिसांनी योग्य वेळी पोहोचून मध्यस्थी करत त्याला खाली उतरवलं असून त्याचे प्राण वाचवले आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, पती आणि पत्नी या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. पत्नीचा पहिला पती मृत असून पतीचीही पहिली पत्नी मृत झाली आहे. यानंतर या दोघांनी दुसरे लग्न केले असल्याचे पोलिसांनी सांगतले आहे. मात्र लग्नांनतर दोघांच्या सतत भांडणे होत असल्याचे बोलले जात आहे. आपली पत्नी आपल्याला टाॅर्चर करते. या त्रासाला कंटाळूनच आपण टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती पतीनं दिली आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/814551912708389/
दरम्यान, लाॅकडाऊनमध्ये कौटुंबिक वादाचे प्रकार मोठ्या संख्येने वाढले आहेत. घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचं पोलिस अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे पोलिसांना कोरोना सोबतच या केस सोडवण्याचा जादाचा ताण पडला असून लोकांना आता मानसोपचारतज्ज्ञांची उणीव भासत असल्याचे बोलले जात आहे.