हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Federal Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र यादरम्यानच, आता खासगी क्षेत्रातील Federal Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
23 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
Federal Bank च्या अधिकृत वेबसाइटनुसार, 23 जानेवारी 2023 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. या बदलानंतर आता बँकेकडून 5 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर आरबीआयच्या रेपो दरापेक्षा 3.20 टक्के कमी दराने व्याज दिले जाईल. त्याच वेळी, 5 लाख ते 50 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर RBI च्या रेपो दरापेक्षा 3.20 टक्के कमी व्याजदर उपलब्ध आहे.
Federal Bank नवीन व्याजदर जाणून घ्या
फेडरल बँक सध्या 50 लाख ते 2 कोटी रुपयांपेक्षा कमी कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर RBI च्या रेपो दरापेक्षा 3.20 टक्के कमी दराने व्याज देत आहे. तसेच फेडरल बँकेकडून 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर RBI च्या रेपो दरापेक्षा 3.20 टक्के कमी व्याजदर दिला जाईल.
खाजगी क्षेत्रातील या बँकेच्या 5 कोटी ते 50 कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर RBI च्या रेपो दरापेक्षा 3.20 टक्के व्याज मिळेल. तसेच, फेडरल बँकेतील 50 कोटी रुपये आणि त्याहून जास्त शिल्लक असलेल्या बचत खात्यावर RBI च्या रेपो दरापेक्षा 3.20 टक्के कमी दराने व्याज मिळत आहे.
हे जाणून घ्या कि, ग्राहकांसाठी Federal Bank कडून नवीन प्रकारचे क्रेडिट कार्ड लाँच करण्यात आले होते. या कार्डचे नाव ग्रुप क्रेडिट शील्ड असे असून यामध्ये एकाच वेळी अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये देण्यात येणारी सर्वात मोठी सुविधा ही फ्री लाईफ इन्शुरन्सची आहे. हे क्रेडिट कार्ड घेणाऱ्या जो व्यक्तीला 3 लाख रुपयांचे फ्री लाईफ इन्शुरन्स कव्हर मिळेल. म्हणजेच, या कार्डधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या नॉमिनीला कव्हर म्हणून 3 लाख रुपये मिळतील. या कार्डचे आणखी एक खास वैशिष्ट्य असे कि, या कार्डवर ग्राहकाला 3 लाख रुपयांपर्यंतची क्रेडिट लिमिट देखील मिळत आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.federalbank.co.in/savings-rate
हे पण वाचा :
Bajaj Finance कडून FD वर मिळत आहे जबरदस्त व्याज, पहा नवीन व्याजदर
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा दुप्पट नफा !!!
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
Budget 2023 : अर्थसंकल्प छापणाऱ्यांना हॉस्पिटलमध्येही जाण्यास असते मनाई, डॉक्टरांची टीमही असते मंत्रालयात कैद!