महिला पत्रकाराची राहत्या घरी आत्महत्या; भिंतीवर लिहिले ‘या’ नेत्याचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील एक स्वतंत्र पत्रकार रिझवाना तबस्सुम तिच्या खोलीत मृत अवस्थेत आढळली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून तिचा मृतदेह ताब्यात घेतला.रात्रीच तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रिझवानाने आपल्या खोलीत असलेल्या नोटिस बोर्डवर लिहिले की – ‘शमीम नोमानी जबाबदार आहे.’

कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्थानिक सपा नेते शमीम नोमानी यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. रिजवाना तबस्सुम वाराणसीची रहिवासी होती. ती २५ वर्षांची होती.

२५ वर्षीय रिझवाना तबस्सुमने राहत्या घरीच आत्महत्या केली
वाराणसीचे सीओ सदर अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले की,आम्हाला कुटुंबियांनी कळविले. त्यानंतर पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. रिझवानाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा खटला दाखल केला गेला आहे. आरोपींच्या अटकेसाठी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

स्थानिक नेते शमीम नोमानी यांच्याविरूद्ध एफआयआर
बातमीदाराच्या म्हणण्यानुसार, रिझवानाच्या कुटूंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बनारसच्या लोहटा पोलिस स्टेशनमध्ये स्थानिक नेते शमीम नोमानीविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे.तबस्सुम ही तिच्या सहा भावंडांमध्ये सर्वांत मोठी होती. गेली कित्येक वर्षे पत्रकारितेमध्ये सक्रिय असलेल्या तबस्सुमने स्वतंत्र पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. खबर लहरीया आणि इतर वृत्तपत्रे यासारख्या वृत्तवाहिन्यांसाठी ती लिहायची. ती प्रिंटसाठीही लिहायची.

वडील म्हणाले – आतून आवाज आला नाही
रिझवानाच्या वडिलांनी सांगितले की,सकाळी त्यांनी मुलीला आवाज दिल्यावर आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. जेव्हा आम्हाला शंका आली तेव्हा आम्ही खोलीचा दरवाजा तोडला आणि आत गेलो तेव्हा तिने आत्महत्या केल्याचे पाहिले. तिने शमीम नोमानी माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. शमीम नोमानी आमच्याकडे आले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

You might also like