बदनामी करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध FIR दाखल

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये १५ वर्षांच्या मुलीला बदनाम करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरूद्ध शारीरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरूणाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती मुलगी साडेपाच महिन्याची गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चेतन वसंतराव कोटमाळे या तरुणाविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
१५ वर्षांची मुलगी आपल्या आईबरोबर मामाकडे राहत आहे. मागच्या २, ३ महिन्यांपासून मुलगी व्यवस्थित जेवण करत नसल्याचे मुलीच्या मामीच्या लक्षात आले. मामीने जेव्हा तिला याबद्दल विचारले तेव्हा तिने काहीच सांगितले नाही. मुलीचे दात दुखत असल्याने ती जेवत नसेल असे घरच्यांना वाटले. यानंतर तिला १५ मे ला तिची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तिचे सोनोग्राफी रिपोर्ट पाहून ती साडेपाच महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर आई व मामीने तिला विश्वासात घेऊन याबाबत विचारणा केली तेव्हा तिने चेतन आणि तिच्यामधील घडलेला सर्व प्रकार सांगितला.

चेतन हा मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सतत घरी येत असायचा. त्यामुळे त्याची आणि मुलीची ओळख झाली होती. त्यानंतर चेतनने मुलीला मोबाईल नंबर मागितला पण तिने तो देण्यास नकार दिला. तेव्हा चेतनने तिला बदनामी करण्याची धमकी दिली. यानंतर मुलीने घाबरून आजीचा मोबाईल नंबर त्याला दिला. यानंतर तो तिला वारंवार फोन करुन प्रेम असल्याचे सांगू लागला. तसेच इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्याचे बोलू लागला. एक दिवस त्याने रात्री १२ वाजता सगळे झोपले असताना त्याने तिला फोन करुन टेरेसवर बोलवले. तेव्हा तिने वाईट कृत्य करण्यास नकार दिल्यावर चेतनने तिची बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावेळी त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्याने पुन्हा याची पुनरावृत्ती करत परत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. असे त्या मुलीच्या आईने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.