गटबाजी चव्हाट्यावर : शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटात तुफान हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप -शिवसेनेत प्रवेश केला . त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे . राष्ट्रवादीतील पडझडीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नगर जिल्ह्य़ातही पक्षाची पडझड झाल्याने पवारांच्या दौऱ्याला महत्त्व होते. मात्र पवारांची सभा संपताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

युती झाल्यास मिळणार २०५ जागा ; तर स्वतंत्र लढल्यास भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार

शरद पवार यांनी सभेला संबोधित केल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान शिवीगाळ, एकमेकांवर धावून जात धक्काबुक्की करणे, कोंडाळे करणे, चप्पल भिरकावणे, असे सारे प्रकार घडले. त्यानंतर एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेले हे सारे गट समोरासमोर आल्याने काहीसा तणावही निर्माण झाला होता. मात्र नंतर आमच्यात काहीच घडले नाही, असे दाखवत सर्वजण पोलीस ठाण्यातून निघून गेले.

गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपच्या वाटेवर ; वंचितच्या अडचणी वाढल्या

दरम्यान या घटनेमुळे नगर शहरातील राष्टवादी काँग्रेसमध्ये कळमकर-जगताप गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत . या दोन्ही गटांच्या वादावर शरद पवार कशा प्रकार मध्यस्थी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Leave a Comment