बीड – शेतीच्या वादातून नेकनूरमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे दोन गटांमधला हा वाद वाढला आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. धारदार शस्त्राचा वापर केल्याने या प्रकरणामध्ये 6 जण जखमी झाले असून, या सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेकनूरमधील दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. हा वाद दिवसेंदिवस वाढत गेला आणि अखेर या वादाचं रुपांतर प्रचंड मारामारीत झालं. विशेष म्हणजे, या मारामारीमध्ये धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. त्यातून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मोहम्मद फहाद कफील, अब्दुल अहाद अब्दुल बासेद, सहाद अब्दुल अहाद, अस्लम पाशा, गुलाम पाशा, अब्दुल सबुर यांचा समावेश आहे.
या सर्वांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अगदी शासकीय रुग्णालयापर्यंत हा संपूर्ण वाद पोहोचल्याचं पाहायला मिळालं. या रुग्णालयातही या दोन गटांतील सदस्यांची एकमेकांबरोबर मारामारी झाली. हा प्रकार सुरू असतानाच कोणीतरी या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला. काही वेळातच सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं परिसरात या संपूर्ण प्रकाराची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group