नाशिकमधील महाविद्यालयात तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चक्क महाविद्यालयीन तरुणींची महाविद्यालयाच्या आवारात चक्क फ्री स्टाईल हाणामारी (Fighting) झाली आहे. नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. या हाणामारीचा (Fighting) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी एकमेकींचे केस ओढून मारहाण करताना दिसत आहे.

या विद्यार्थीनींची हाणामारी सुरू असताना आजूबाजूला बरेच विद्यार्थी जमा झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, कोणीही ही भांडणं सोडवण्यासाठी पुढे येत नाही. याठिकाणी विद्यार्थी मोठमोठ्याने ओरडत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या हाणामारीचा (Fighting) व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून व्हायरल केला आहे.

या तरुणींमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद झाला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. व्हिडिओमध्ये चार तरुणी दिसत आहेत. यातील दोघी एकमेकींचे केस ओढून हाणामारी (Fighting) करत आहेत. तर, इतर दोघी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती