औरंगाबाद – राज्याचे अल्पसंख्यांक आणि वफ्फ मंत्री नवाब मलिक यांच्यावर ॲट्रोसिटी दाखल करण्यात यावी, असा तक्रार अर्ज डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांनी काल विशेष सत्र न्यायाधीश एस के कुलकर्णी यांच्या न्यायालयात केला आहे.
वानखेडे व त्यांच्या परीवाराला विरुद्ध नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांवर वक्तव्य केले होते. समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत 9 नोव्हेंबर 2019 रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
मात्र पोलिसांनी त्या अर्जाची दखल न घेतल्याने समीर वानखेडे यांच्या आत्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.