31 जुलैपर्यंत ITR भरा; अन्यथा होईल ‘इतका’ दंड

ITR
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक वर्ष 2021-22 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आता अगदी जवळ आली आहे. जर तुम्ही अजून ITR भरला नसेल तर आता जास्त उशीर न करता हे काम पूर्ण करा. आयटीआर भरणे अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकते. ITR दाखल करण्याची अंतिम तारीख (ITR Filing Deadline) 31 जुलै 2022 आहे. म्हणजे तुमच्याकडे आयटीआर फाइल करण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक आहेत.

अजूनही इतक्या कोटी लोकांनी आयटीआर भरलेला नाही

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३ कोटींहून अधिक लोकांनी रिटर्न भरले आहेत. मात्र, ३१ जुलैपर्यंत सुमारे ७ कोटी आयटीआर दाखल करायचे आहेत. अशा परिस्थितीत, जर शेवटच्या दिवसांत सुमारे 4.5 कोटी लोकांनी रिटर्न फाइल केले तर रिटर्न फाइलिंग पोर्टलवरील लोड वाढू शकतो आणि सिस्टम स्लो होऊ शकते. अशा समस्या टाळण्यासाठी, तुम्ही उशीर न करता तुमचे रिटर्न भरणे महत्त्वाचे आहे. रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये, असेही टॅक्स तज्ज्ञांचे मत आहे.

वेळेवर आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचा इन्कम टॅक्स रिफंड झाला असेल, तर तुम्ही जितक्या लवकर इन्कम टॅक्स रिटर्न फाइल कराल तितक्या लवकर रिफंड तुमच्या खात्यात येईल. शिवाय, शेवटच्या तारखेला रिटर्न भरताना अनेकदा चुका होतात. तुमचा रिटर्न वेळेवर भरून तुम्ही हे टाळू शकता. अंतिम मुदतीनंतर ITR दाखल केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्यासाठी, 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नावर 1,000 रुपये लेट फी आकारली जाईल. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नासाठी हीच रक्कम 5,000 रुपये असू शकते.

मुदत वाढवण्याचा हेतू नाही

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आयटीआर फाइलिंग डेडलाइनमध्ये 4 दिवस उरले आहेत. लोकांची अपेक्षा आहे की सरकार दरवेळेप्रमाणे या वर्षीही अंतिम मुदत वाढवेल. मात्र, यावेळी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा विचार करत नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सरकार यापुढे मुदत वाढवणार नाही.

ITR स्वतः कसा भरायचा-

आयटीआर भरण्यासाठी, तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. आयकर रिटर्न भरण्यासाठी, तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, गुंतवणूक तपशील आणि फॉर्म 16 किंवा फॉर्म 26AS आवश्यक असेल. .