संबधितावर गुन्हा दाखल : शर्यतीच्या बैलाची हत्या नाही, अपघातात मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जावली तालुक्यातील सरताळे येथे एका शर्यतीच्या बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत होते. कारण या बैलाचे पाय मोडले होते. मात्र, या प्रकरणाच्या तपासात या बैलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा बैल पुणे ग्रामीण हद्दीतील किकली या गावचा आहे.

काही दिवसांपूर्वी सरताळे येथे एका बैलाचा मृतदेह आढळून आला होता. या बैलाची हत्याच करण्यात आली, अशी चर्चा सुरू होती. या घटनेचा शोध घेवून संबधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांच्यातून होत होती. त्यामुळे मेढा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किकली येथील या शर्यतीच्या बैलाचा अपघातात मृत्यू झाला होता. संबंधिताने बैलाची भरपाईसुद्धा घेतली. पण आता या बैलाचा मृतदेह टाकायचा कुठे? असा प्रश्न संबंधितांना पडला.

सरतेशेवटी एका टेम्पोमधून बैलाचा मृतदेह सरताळे येथे आणून टाकला. महामार्गावरून रात्रीच्या सुमारास निर्जनस्थळ शोधून बैल टेम्पोतून खाली टाकला. मात्र, रस्त्यापासून मृतदेह बाजूला नेताना त्यांनी बैलाच्या पायाला दोर बांधला. त्यानंतर टेम्पोने ओढत नेला. त्यामुळे या बैलाचे पाय मोडले. याप्रकरणी संबंधितांवर मेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment