Thursday, March 23, 2023

सातारा कनेक्शन : कोल्हापूर जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

- Advertisement -

कोल्हापूर | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर तालुक्यातील घुणकी फाट्यावर गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या प्रतीक उर्फ सोन्या संजय यादव (वय 20, रा. कोरेगाव जि. सातारा) आणि दाजी (रा. कोल्हापूर. संपूर्ण नावाचा उल्लेख नाही) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. दरम्यान 16 किलो वजनाच्या गांजासह, मोटरसायकल, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 2 लाख 16 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयीत प्रतीक व दाजी हे दोघे मोटरसायकलवरून (एम एच – 11- सीएफ- 4900) बेकायदेशीरपणे पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन जात होते. दरम्यान घुणकीजवळील भगव्या चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने त्यांना पकडले. तपासणी केली असता पोत्यात हिरवट रंगाचा गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.

- Advertisement -

दरम्यान सुमारे 16 किलो 150 ग्रॅम वजनाचा 1 लाख 45 हजार 350 रुपये किंमतीचा मोटरसायकल, मोबाईल व रोख रक्कम असा 2 लाख 16 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबतची फिर्याद गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस कर्मचारी किरण गावडे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.