नवी दिल्ली | भाजप नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांचे काल शनिवारी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. विविध आजारांनी ग्रासल्याने त्यांचे शरीर क्षीण झाले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून ९ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्या पार्थिवावर निगम बोधी घाट येथे अंत्यसंस्कार करून अंतिम निरोप देण्यात आला.
Delhi: Former Union Minister and BJP leader, #ArunJaitley cremated with full state honours at Nigambodh Ghat, today. pic.twitter.com/Nj2THkdnPv
— ANI (@ANI) August 25, 2019
अरुण जेटली यांचे पार्थिवावर बोधी घाट येथे आणण्याआधी भाजपच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव बोधी घाटाकडे रवाना करण्यात आले. पार्थिव बोधी घाटावर आणल्यावर गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्र्पती व्यंकय्या नायडू , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी नेत्यांनी पुष्प चक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांना लष्कराच्या वतीने बंदुकीच्या फैरी हावेत झाडून मानवंदना देण्यात आली.
अरुण जेटली यांच्या पार्थिव शरीराला मुलगा रोहन जेटली यांनी मुखाग्नी दिला. अरुण जेटली यांच्या अंत्यविधीसाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पियुष गोयल, रामदास आठवले, राम विलास पासवान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार , कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयोरप्पा त्याच प्रमाणे अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते.