हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आर्थिक वर्ष 2022 चा शेवटचा महिना (1 डिसेंबर) आजपासून सुरू झाला आहे. दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही असे अनेक मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. त्यामध्ये सीएनजी आणि एलपीजीच्या किंमतींमधील संभाव्य बदल आणि पेन्शनशी संबंधित मोठे अपडेटचा देखील समावेश आहे. याशिवाय उद्यापासून अनेक गाड्यांच्या वेळेतही बदल होऊ शकतो. चला तर मग उद्यापासून कोणते 5 मोठे बदल होणार आहेत ते जाणून घेऊयात…
सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती देशातील प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलत असतात. गेल्या काही महिन्यांत सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढल्या आहेत.
1 तारखेपासून PNB एटीएममधून पैसे काढण्याची पद्धतही बदलू शकते. आता मशीनमध्ये कार्ड टाकल्यावर आपल्या फोनवर एक OTP मिळेल जो टाकल्यानंतरच पैसे काढता येतील. Financial Changes
पेन्शनधारकांचे लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. आजपासून पेन्शनधारकांना लाइफ सर्टिफिकेट सादर करता येणार नाहीत. जर आपण लाइफ सर्टिफिकेट सादर केले नाही तर पेन्शनही थांबली जाऊ शकते. Financial Changes
हे लक्षात घ्या कि, डिसेंबरमध्ये थंडी मध्ये प्रचंड वाढ होते. ज्यामुळे दाट धुकेही पडते, त्यामुळे अनेक गाड्यांच्या वेळेत बदल केले जातात. रेल्वेकडून डिसेंबर 2022 ते पुढील वर्षी मार्चपर्यंत जवळपास 50 गाड्या रद्द केल्या आहेत. Financial Changes
थर्ड पार्टी इन्शुरन्सशी संबंधित शुल्कामध्येही वाढ होऊ शकेल. मात्र, ही वाढ अत्यंत किरकोळ असेल. Financial Changes
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.IRCTC.com
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा