हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात टिकटॉक ऍप वर बंदी घातल्यापासून भारतीय Chingari ऍप ला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. टिकटॉक बंदी नंतर हे ऍप १ तासाला सरासरी १ लाख वेळा डाऊनलोड केले जात आहे. तर दर तासाला २ लाख व्ह्यूज मिळत आहेत. खूप कमी वेळात या ऍपच्या डाउनलोड्सची संख्या १ कोटींच्यावर पोहोचली आहे. यादरम्यान पहिल्यांदाच कंपनीने आपला पहिला डिजिटल टॅलेंट हंट शो सादर केला आहे. ज्याला चिंगारी स्टार्स: टैलेंट का महासंग्राम (Chingari Stars: Talent Ka Mahasangram) असे नाव देण्यात आले आहे.
या शोमध्ये जिंकणाऱ्या उत्कृष्ट कंटेंट क्रिएटरला १ कोटीचे बक्षीस दिले जाणार आहे. आणि प्रत्येक राज्यातील उत्कृष्ट कंटेंट क्रिएटरला ५ लाख रुपये दिले जाणार आहेत.या शो अंतर्गत युजर्स नृत्य, गायन, अभिनय, मिमिक्री, कॉमेडी आणि इनोव्हेशन कॅटेगिरीमध्ये आपले व्हिडीओ अपलोड करू शकतात. देशातील कुणीही नागरिक यात सहभागी होऊ शकतो. Chingari ऍपच्या को-फाउंडर सुमित घोष यांच्या मते या शोचा हेतू देशी टॅलेंट ला व्यासपीठ देणे हा आहे.
कंपनीच्या मते स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराला १५-६० सेकंदाचा व्हिडीओ अपलोड करायचा आहे. सहभागीच्या सादरीकरणावर त्याला पुढच्या फेरीसाठी निवडले जाईल. Chingari ऍप मध्ये यासाठी लाईव्ह मतदान होईल. त्यानंतर जिंकणाऱ्या उमेदवाराला Chingari Stars: Talent Ka Mahasangram कडून बेस्ट कंटेंट क्रिएटर ला १ कोटी रुपये बक्षीस दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधी हे ऍप डाऊनलोड करावे लागेल. स्वतःचे प्रोफाइल बनवावे लागेल. आपली कॅटेगिरी निवडावी लागेल. मग १५-६० सेकंदाचा व्हिडीओ अपलोड करावा लागेल. मग तो आपल्या मित्रांसोबत शेअर करावा लागेल आणि त्यांनाही ऍप डाऊनलोड करण्यास सांगावे लागेल. मग मित्रांना व्हिडीओ लाईक करायला सांगावे लागेल. २५ ऑगस्ट ला विजेता घोषित केला जाईल. अधिक माहिती ऍपच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
हे पण वाचा –
गुड न्यूज! मोदी सरकारकडून मोफत मिळेल गॅस सिलिंडर, आधी करावे लागेल ‘हे’ काम
सोन्या-चांदीच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या
गर्लफ्रेंडला भेटायला उस्मानाबादचा तरुण मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला; BSF ने अडवले
सावधान ! जर आपल्याकडे असतील एकापेक्षा जास्त बँकांमध्ये Saving Account तर होऊ शकेल ‘हे’ मोठे नुकसान