20 जुलै पासून बदलणार रेल्वेचा नियम, मुंबई लोकल मध्ये प्रवास करण्यासाठी लागणार ‘हा’ QR कोड 

मुंबई । कोरोना काळात रेल्वेने प्रवासात काही गरजेचे बदल केले आहेत. संक्रमणाच्या धोक्याला कमी करण्यासाठी रेल्वेत, प्लॅटफॉर्मवर तिकीट चेकिंग सिस्टीम मध्ये बदल करण्यात आला आहे. आता पश्चिम रेल्वेही एक मोठा बदल करते आहे. रेल्वे प्रवासासाठी QR कोड बंधनकारक करण्यात आला आहे. २० जुलै पासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत.

कोरोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. QR कोडशिवाय आता प्रवास करता येणार नाही. हा कोड राज्य सरकारकडून बनविला जाईल. जो दाखवूनच आता प्रवास करता येणार आहे. या नव्या नियमांसहित १५ जूनला लोकल ट्रेनची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला ओळखपत्रावर सूट दिली गेली मात्र बनावट ओळखपत्रे समोर आली. म्हणून हा नवा नियम करण्यात आला आहे.

कोरोना संक्रमण काळामुळे मुंबईत लोकल स्थगित आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली आहे. सध्या मुंबईमध्ये ७०२ लोकल ट्रेन चालू आहेत. ज्यातील ३५० रेल्वे पश्चिम रेल्वे वर सुरु आहेत. या रेल्वेमध्ये राज्य सरकारच्या अत्यावश्यक कार्यातील लोकांना, गृह मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या कामातील कर्मचाऱ्यांना जसे की, केंद्रीय कर्मचारी, आयकर, जीएसटी एवं सीमा शुल्क, पोस्ट ऑफिस, बँक कर्मचारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, कोर्ट तसेच राजभवन मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी आहे.

हे पण वाचा –

भारतातील ‘या’ बाजारात दररोज विकले जाते कित्तेक किलो माकडांचे मांस, फोटो पाहून तुम्ही जाल हादरुन

‘या’ गावातील दीड डझन मुलींनी सोडले आपल्या सासरचे घर, कारण ऐकून आश्चर्यचकित व्हाल !

धक्कादायक ! जेव्हा 2 वर्षाचे मूल 5 व्या मजल्यावरून खाली पडते आणि शेजारी त्याला पकडतो; पहा व्हिडीओ

गर्लफ्रेंडला भेटायला उस्मानाबादचा तरुण मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला; BSF ने अडवले

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?