दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचा आर्थिक फटका अन्य उद्योगांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध शिल्लक राहत आहे. त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

‘या’ दिवशी होणार रेल्वे तिकीट बुकिंगला सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेच्या बुकिंगला १५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयआरसीटीसी अँप आणि वेबसाईटवर १५ एप्रिलपासून प्रवासाची तिकिटं उपलब्ध असणार आहेत. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. लॉकडाउनच्या कालावधीत करोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण देशात भारतीय रेल्वेने आपली … Read more

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

प्रत्येक संकट हे संधी घेऊन येतं, ही संधी आहे जागतिक संकटाला सामोरं जाताना एकत्र यायची आणि मानवजातीला आवश्यक गोष्टींची मुक्तपणे एकमेकांसोबत देवाणघेवाण करण्याची. यासंदर्भातील हा लेख प्रत्येकाने वाचायलाच हवा.

नाना पाटेकरांच्या नाम फाऊंडेशनकडून कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी १ करोडची मदत

मुंबई प्रतिनिधी | अभिनेते आणि नाम फाऊंडेशन चे संस्थापक नाना पाटेकर यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी १ करोड रुपये दान केले आहेत. नाम फाऊंडेशन मार्फेत आपण सीएम, पीएन फंडासाठी प्रत्तेकी ५० लाख रुपये देत आहोत अशी माहिती पाटेकर यांनी दिली आहे. कोरोना विषाणूसोबत सरकार एकटे लढू शकणार नाही. तेव्हा सरकारला आपण साथ द्यायला हवी. जात – … Read more

करोनामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार तेव्हा तयार राहा! शरद पवारांचे भाकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे देशासमोर मोठं आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळं पुढचे काही महीने आपल्याला भरपूर काटकसर करावी लागणार आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे आज संवाद साधला. करोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळं वायफळ खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. नगर … Read more

गरिबांसाठी मोबाईल सेवा फ्री करा; प्रियांका गांधींचे टेलिकॉम कंपन्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळं गरीब मोबाईल धारकांसाठी मोबाईल सेवा फ्री करा अशी मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधींनी यासंबंधी टेलिकॉम कंपन्यांना एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कोरोनाच्या संकटात महानगरातून गावाकडे निघालेल्या अनेकांचा बॅलन्स संपला आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब आणि स्थलांतरितांचा विचार करत त्यांना एक … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी बीसीसीआयने’पीएम केयर्स’फंडात दिले ५१कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जागतिक महामारीचा धोकादायक ठरलेल्या कोविड १९ या भयानक विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान मदत निधीला ५१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शाह यांनी शनिवारी (२८ मार्च) एक निवेदन जारी केले की, कोरोनाशी लढा देण्याच्या भारताच्या लढाईत बीसीसीआय पंतप्रधान मदतनिधीला … Read more

घोषणा तर झाल्या, आता संचारबंदीमध्ये गरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचेल ना?

कोरोनाशी लढताना अन्नधान्य वितरण प्रणाली सदोष राहू नये आणि सरकारची मदत प्रत्येकाला मिळावी यासाठी काय करता येईल याचा आढावा.

आता मारुती-सुझुकी बनवणार व्हेंटिलेटर; १० हजार व्हेंटिलेटरचे लक्ष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने देशात व्हेंटिलेटरची कमतरता पाहता भारतातील वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना व्हेंटिलेटर बनविण्याची विनंती केली आहे. या विनंतीला प्रतिसाद देत वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती-सुझुकीने आता व्हेंटिलेटर बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मारुती-सुझुकी व्हेंटिलेटर, मास्क आणि अन्य उपकरणांच्या निर्मितीमध्ये सरकारला सहाय्य करणार आहे. त्यासाठी मारुतीने AgVa हेल्थकेअर बरोबर काही करार केले … Read more

हे स्पष्ट आहे की जग मंदीच्या सावटाखाली आहे: आयएमएफ चीफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या प्रमुखांनी म्हटले आहे की जग आता मंदीच्या चक्रात आहे हे आता स्पष्ट झाले आहे आणि ते २००९ च्या मंदीपेक्षा वाईट आहे. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जियावा यांनी शुक्रवारी सांगितले की कोरोनाव्हायरस नावाच्या साथीने जागतिक अर्थव्यवस्थेची पीछेहाट झाली आहे आणि विकसनशील देशांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासू … Read more