विनाअनुदानित LPG सिलिंडर 19 रुपयांनी महाग, विमानाच्या इंधन किंमतीतही वाढ

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे बुधवारी विमानाच्या इंधन (एटीएफ) च्या किंमतीत 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. विना अनुदानित एलपीजी सिलिंडरही 19 रुपयांनी महागला आहे. दराबाबत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार दिल्लीतील विमानाच्या इंधनाची किंमत प्रतिलिटर 1,637.25 रुपये म्हणजेच 2.6 टक्क्यांनी वाढून 64,323.76 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती वाढल्यामुळे सलग दुसर्‍या महिन्यात … Read more

अबब!!! साईचरणी वर्षभरात २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान

अहमदनगर । शिर्डीच्या साई चरणी २०१९ मध्ये तब्बल २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान प्राप्त झाले आहे. ऑनलाइन, डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून सदर देणग्या देण्यात आलेत. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षापेक्षा २०१९ या वर्षात यंदा साई चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीमध्ये दोन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. यामध्ये दक्षिणा पेटीत १५६ कोटी ४९ लाख … Read more

आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : 31 डिसेंबर पर्यंत आधार आणि पॅनकार्ड लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होईल अशी माहिती पुढे येत असतानाच सरकारने अजूनही ज्यांनी आधार आणि पॅन लिंक केलेले नाही अशा नागरिकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच उद्या … Read more

नववर्षात सांगली मनपा क्षेत्रातील नागरिकांना बसणार करवाढीचा आर्थिक फटका

महापालिकेच्या दर सुधार समितीने बंद पाणीमिटर, अस्वच्छ भूखंड, खोकी हस्तांतर, दुकानगाळ्यांची भाडेपट्टी, दैनंदिन परवाना फी, बांधकाम शुल्क, हॉटेल व बिअर बार परवान्यासह इतर लागणाऱ्या ‘एनओसी’मध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने देखील तयार केला आहे. हा प्रस्ताव महासभेला जाणार असल्याने नवीन वर्षात महापालिका क्षेत्रातील व्यवसायिक व नागरिकांना करवाढीचा दणका बसणार आहे. मनपाचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी करवाढ करणे अटळ असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले.

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी 1 जानेवारीपासून नवीन नियम

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या प्रक्रियेत एक महत्वपूर्ण बदल केला आहे. एटीएममधील अनधिकृत व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी बँक वन-टाइम पासवर्ड आधारित रोख रक्कम काढण्याची प्रणाली आणत आहे. ही नवीन प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून अंमलात येईल. त्याअंतर्गत सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 … Read more

पुणे मेट्रोला मिळाला मुहूर्त; येत्या जून पासून ‘हा’ टप्पा होणार प्रवाशांसाठी सुरु

पुणे प्रतिनिधी | आनंदनगर ते गरवारे महाविद्यालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय ते येरवडा या मेट्रो टप्प्यांवरील प्रवाशांना येत्या जूनपासून मेट्रोतून प्रवास करता येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या टप्प्यांतील प्रत्येकी पाच किलोमीटरचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. यापूर्वी पुण्यात डिसेंबरमध्ये मेट्रो धावेल, असा दावा करण्यात … Read more

कांदा दरवाढीचा भजी व्यापाऱ्यांवर देखील परिणाम; ग्राहकांची आवड पुरवणं हल्ली दुकानदारांना मुश्किल

कांदा भजी हा तसा महाराष्ट्रातील सर्व जनतेचा जिव्हाळ्याचा विषय. अन ते जरी भजी हे सोलापूरचे असतील तर त्यांची ‘बात काही औरच’! संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर चे कांदा भजी हे विशेष प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून केवळ कांदा भजी खाण्यासाठी लोक सोलापुरात येत असतात. कांदा भाज्यांसहित भज्यांचे विविध प्रकारही येथील अनेक दुकानात उपलब्ध असतात. मात्र सर्वांच्या आवडीचे कांदा भजी सध्या ग्राहकांवर रुसल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळत आहे. कांद्याचे दर मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात कांद्याचे भाव उतरले; १०० चा कांदा आला ५० ते ६० रुपयांवर

संपूर्ण देशाच्या बहुतांश भागात यंदा पावसाने उशिरापर्यंत जोरदार हजेरी लावली. तसेच उशिरा झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याचा सर्वात मोठा परिणाम कांद्याच्या उत्पनावर झाला. घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. राज्याप्रमाणे औरंगाबाद मध्ये देखील कांद्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता काही प्रमाणात कांद्याचे दर झाल्याचे पाहण्यात येत आहे.

न्यू फलटणचा दत्त इंडिया शुगरने घेतला ताबा; ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांना दिलासा

‘न्यू फलटण शुगर वर्क्स लि.’ हा यंदा ‘दत्त इंडिया शुगर प्रा. लि.’ने ताब्यात घेतला आहे. कारखाना पुन्हा चालू झाल्याने साखरवाडी परिसर पहिल्यासारखा गजबजला आहे. तसेच तालुक्यातील दिवाळखोरीत निघणारी मोठी संस्था वाचून ऊस उत्पादकांचे थकीत पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक व कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कांद्याची उणीव केंद्र सरकार लवकरच भरून काढणार; १२ हजार मेट्रिक टन कांदा करणार आयात

केंद्र सरकारने अतिरिक्त १२ हजार ६६० मेट्रिक टन कांदा आयातीसाठी करार केला आहे. हा कांदा २७ डिसेंबर पासून भारतात येण्यास सुरूवात होणार आहे. याचबरोबर आता आयात केल्या जाणाऱ्या एकुण कांद्याचे प्रमाण हे जवळपास ३० हजार मेट्रिक टन पर्यंत पोहचले आहे.ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून गुरूवारी ही माहिती देण्यात आली.