ज्यामुळे मुंबईतील बर्‍याच भागात वीज गेली Power Grid म्हणजे काय ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ग्रीड निकामी झाल्यामुळे मुंबईतील बर्‍याच भागात वीज गेली आहे. वीजपुरवठा ठप्प झाल्याने लोकल ट्रेन सेवाही बंद झाली आहे. मुंबईत कुठेही वीज येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत 10.15 मिनिटांनी वीज गेली. येथे टाटा पॉवरच्या केंद्रीय ग्रीडच्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील वीज पुन्हा सुरु होण्यास एक तास लागू शकेल. ग्रीड बिघाडामुळे मुंबई शहर व उपनगरामध्ये वीज नाही. मध्य, पूर्व आणि पश्चिम मार्गावर ट्रेन सेवाही विस्कळीत झाली आहे. वीजपुरवठा करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या लाईनच्या नेटवर्कला पॉवर ग्रीड असे म्हणतात. भारतात एकूण पाच पॉवर ग्रीड आहेत – उत्तर ग्रीड – पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, यूपी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, चंडीगड ,पूर्व ग्रिड – पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, सिक्कीम.

(1) पॉवर ग्रीड कशी फेल होते – भारतातील विजेचे ट्रांसमिशन 49-50 हर्ट्जच्या फ्रीक्वेंसीवर होते. जेव्हा ही फ्रीक्वेंसी सर्वोच्च किंवा निम्न स्तरावर पोहोचते तेव्हा पॉवर ग्रिड फेल होते. अशा परिस्थितीत ट्रान्समिशन लाइनवर ब्रेकडाउन होते, ज्यास ग्रीड फेल्योर असे म्हणतात. यामुळे पुरवठा ठप्प होतो आणि जिथे वीज पुरवठा केला जातो अशा स्टेशनपासून फ्रीक्वेंसीवर लक्ष ठेवावे लागते. या स्टेशनना 48.5 ते 50.2 हर्ट्ज दरम्यान फ्रीक्वेंसी मेंटेन ठेवणे आवश्यक असते. नॅशनल लोड डिस्पॅच सेंटर यासाठी राज्यांची देखरेख करते. बर्‍याचदा, राज्यात मर्यादेपेक्षा जास्त वीजपुरवठा होतो, ज्यामुळे ग्रीडमध्ये बिघाड होतो.

(2) ग्रिड हे वीज वाहिन्यांचे नेटवर्क आहे, ज्याद्वारे ग्राहकांना वीज पुरविली जाते. म्हणजेच, आपल्या घरात किंवा कार्यालयात वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या नेटवर्कला पॉवर ग्रीड असे म्हणतात. पॉवर ग्रीडमध्ये पॉवर जनरेशन, पॉवर ट्रांसमिशन आणि पॉवर डिस्ट्रीब्यूशन या तीन टप्प्यांचा समावेश असतो.

(3) वीज निर्मिती ही अनेक प्रकारे केली जाते. ती पाण्यापासून म्हणजे धरणात पाणी साठवून बनवली जाते. कोळशापासूनही वीज बनविली जाते. हवेपासूनही वीज बनविली जाते. वीज निर्मितीनंतर ती ज्या राज्यात किंवा ज्या भागातून ती जोडली गेली आहे तेथे पुरविली जाते. या वीजपुरवठ्यास पॉवर ट्रांसमिशन म्हणतात. यानंतर, वीज संबंधित वीज केंद्रांद्वारे ग्राहकांना पुरविली जाते, ज्यास पॉवर डिस्ट्रीब्यूशन असे म्हणतात.

(4) या तीन टप्प्यात वीजपुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्‍या लाईनच्या नेटवर्कला पॉवर ग्रीड असे म्हणतात. भारतात एकूण पाच पॉवर ग्रीड आहेत – उत्तर ग्रीड – पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, यूपी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, चंडीगड पूर्व ग्रिड – पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, सिक्कीम. ईशान्य ग्रिड – अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा. वेस्टर्न ग्रिड – महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा दक्षिणी ग्रिड – तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुडुचेरी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment