नवी दिल्ली । कोणतेही बचत खाते हे त्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे ज्यांना कोणत्याही वेळी पैशांची गरज भासते. बचत खात्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते केवळ तुमच्या ठेवींवर व्याजच देत नाही तर ते तुम्हाला कधीही पैसे काढण्याची परवानगी देते. मात्र इथे तुम्ही एक गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला बचत खात्यावर (10,000 च्या वर) मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स भरावा लागेल कारण ते इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न मानले जाते.
बचत खात्यातील डेली बॅलन्सच्या आधारावर व्याज मोजले जाते आणि व्याज दर तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो. बचत खात्यात ठेवलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतचा DICGC अंतर्गत इन्शुरन्स उतरवला जातो. म्हणजे बँक बुडली तरी तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते. आज आपण वेगवेगळ्या बँकांमधील बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाबद्दलची माहिती घेणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया: जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते असेल, तर बँक तुम्हाला झिरो बॅलन्स वर खाते ठेवण्याची सुविधा देखील देते. तुम्हाला वार्षिक 2.75% व्याजदर देते.
HDFC बँक: 2 फेब्रुवारी 2022 नंतर, HDFC बँक आपल्या बचत खात्यातील ग्राहकांना वेगवेगळ्या रकमेवर व्याजदर देत आहे. तुम्ही 50 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवल्यास तुम्हाला वार्षिक 3% व्याज मिळेल. 50 लाखांपेक्षा जास्त आणि 1000 कोटींपेक्षा कमी रकमेवर 3.50% आणि 4.50% व्याज दिले जाते.
ICICI बँक: सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेली ICICI बँक 50 लाखांपेक्षा कमी ठेवींवर 3% आणि 50 लाखांपेक्षा जास्त ठेवींवर 3.50% व्याज देते.
एक्सिस बँक : 50 लाखांपेक्षा कमी ठेवींवर 3% वार्षिक, 50 लाखांपेक्षा जास्त आणि 10 कोटींपेक्षा कमी ठेवींवर 3.50% वार्षिक, 10 कोटींपेक्षा जास्त आणि रु.100 कोटींपर्यंतच्या ठेवींवर वार्षिक 3.50% दराने रेपो + (-0.65%) व्याज दिले जाते.
पंजाब नॅशनल बँक (PNB): ही सरकारी बँक 10 लाखांपर्यंतच्या ठेवींवर 2.75% आणि सरकारी बचत खात्यात 10 लाखांपेक्षा जास्त ठेवींवर 2.80% व्याज देते.