हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड चढ- उतार झाल्यानंतरही भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मात्र भारतीय तेल कंपन्यांनी आजही इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये कायम आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटरवर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये तर, डिझेलची किंमत 91.43 रुपये आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून किंमत प्रति बॅरल 110 डॉलर आहे. त्यामुळे आगामी काळात इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलचे दर एकत्रितपणे वाढवण्याऐवजी सरकारी तेल कंपन्या दररोज किमतीत किरकोळ वाढ करण्याचा विचार करू शकतात,