Wednesday, October 5, 2022

Buy now

“शरद पवारांचे दाऊद इब्राहिमवर प्रेम असेल त्यांनी गांधीजींचा फोटो काढून दाऊदचा लावावा”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. अशात त्यांचा राजीनामा घेतला जात नसल्याने भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर नितेश राणे व त्यांचे बंधू निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “महाविकास आघाडी सरकारला दाऊदचा इतका पुळका आहे तर त्यांनी दाऊदला महाराष्ट्र भूषण देऊन टाका, असे राणे यांनी म्हंटले आहे.

नितेश राणे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही हिंदूची बाजू घेतली आहे, तसेच चुकीचं काही बोलेलो नाही. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. मी केलेल्या वक्तव्यावरून माझ्या आणि माझ्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर महाविकास आघाडी आणि शरद पवार यांचे दाऊद इब्राहिमवर इतकच प्रेम असेल तर त्यांनी त्यांच्या केबिनमधून गांधीजींचा फोटो काढून दाऊदचा फोटो लावावा. आम्ही महाविकास आघाडी सरकारचा पर्दाफाश केल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.

नवाब मलिक यांच्या बाबत केलेल्या विधानाबाबत राणे म्हणाले की, आम्ही काहीही चुकीचं बोललेलो नाही अनिल देशमुख हिंदु असल्याने त्यांचा राजीनामा घेतला आहे. मग नवाब मलिक मुस्लिम असल्याने त्याचा राजीनामा घेतला नाही का ? आम्ही हिंदू मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केलेले नाही. तरीही योग्य वेळ आली कि आम्ही योग्य उत्तर देऊ, असे राणे यांनी म्हंटले आहे.