हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग लागली असल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी लागलेली आग ही लेवल 3 स्वरूपाचं असून अग्निशमन बचावकार्य करत आहे. या घटनेत 15 जण जखमी झाले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
#UPDATE | Two people have died in the fire incident that broke out in 20 storeys Kamala building near Mumbai’s Bhatia hospital in Tardeo: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) January 22, 2022
आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. 13 फायर इंजिन आणि 7 जंबो टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईच्या महापौर आणि स्थानिक आमदारांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, सहा वृद्धांना ऑक्सिजनची गरज असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आग नियंत्रणात आली असून सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे.