औरंगाबाद : शहरातील गुलमंडी-पैठणगेट रोडवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या औषधी भवनाच्या बिल्डींगच्याखाली असलेल्या नाल्याला आज सकाळी आग लागली. या आगीमुळे औषधी भवनाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलासह नागरिकांची पळापळ सुरू होती.
रविवार बाजार गांधीनगरमार्गे औरंगपु-याच्या दिशेने हा नाला जातो. या नाल्यावर औषधी भवन बांधण्यात आले असल्याने नाल्याखाली पूर्ण कचरा जमा होतो. जमा झालेला कचरा महापालिकेच्या कर्मचार्यांना साफ करता येत नसल्या कारणाने कचरा वर्षानुवर्षे औषधी भवनच्या बिल्डींगखाली जमा होतो. वर्षभरापासून हा कचरा काढण्यातच आला नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याचे समजते. आग विझवण्यासाठी महानगर पालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी हजर होते.
या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे की, आम्ही मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांना एक दिवस अगोदर या नाल्याबाबत कल्पना दिली होती. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नाल्यात आग लागली असून कचरा मोठ्या प्रमाणावर साचला आहे. स्थानिकांनी या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou