हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या गेटवर आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान गोळीबार झाला असला तरी सुदैवाने आमदार बनसोडे हे सुखरूप आहेत.
आज दुपारच्या सुमारास कार्यालयाच्या गेटवर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी तानाजी पवार नावाचा इसमाने त्यांच्यावर हल्ला केला. तानाजी पवार याने पिस्तुलातून अण्णा बनसोडे याच्यावर तीन राऊंड फायर केल्याची माहिती मिळते आहे. या गोळीबारातून अण्णा बनसोडे हे थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन तानाजी पवार याला ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल सुद्धा जप्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पिंपरी-चिंचवड पोलिस करत आहेत
वादातुन घडली घटना
यानंतर एक व्हिडीओ जारी करून आमदार बनसोडे यांनी सुखरूप असल्याचे सांगितले आहे. हि घटना एका वादातून झाल्याचे समोर येते आहे. त्यांनी म्हंटले आहे की, ‘अँथनी म्हणून कॉन्टॅक्टर आहे. मी त्याला वैयक्तिक ओळखत नाही तानाजी पवार हा त्याचा सुपरवायझर आहे. तो सकाळी आला त्याने वाद घातला.. त्यानंतर त्याने फायरिंग केली… माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं. मी सुखरूप आहे तुम्ही शांततेत राहा’ असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केला आहे