चिअर्स!! तळीरामांसाठी खुषखबर; आता घरबसल्या तयार करा थंडगार Beer

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बियर (Beer) हे अनेकांचे आवडते ड्रिंक आहे. सध्या उन्हाळा सुरु झाला असून या दिवसात बिअरच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. उन्हाच्या कडाक्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना अनेकजणांना थंडगार बिअर पिण्याची इच्छा होते. चिल्ड बिअर म्हंटल की शौकीन अंत्यंत आनंदित असतात. परंतु कधी कधी दुकानातून बिअर घरी आणेपर्यंत गरम होते आणि मग तिची चव हवी तशी लागत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून आता घरच्या घरी आपल्याला बिअर बनवता येणार आहे. होय, तुम्हाला पटणार नाही पण हे खरं आहे.

जर्मनीतील एका ब्रॅंडने आता बिअर पावडर तयार केली आहे. त्यामुळे तुम्ही फक्त दोन चमचे पावडर थंड पाण्यात मिसळून थंडगार बिअर तयार करू शकता. यासोबतच हे पर्यावरणासाठीही खूप फायदेशीर आहे. कारण पावडर बिअर बनवताना जास्त कार्बन उत्सर्जन होत नाही. पूर्व जर्मनीमध्ये ही बिअर पावडर बनवण्यात आली असून याआधी कुणीही अशाप्रकारे पावडरच्या स्वरूपात बिअर बनवली नव्हती.

कंपनीचा दावा आहे की अवघ्या 2 मिनिटात तुम्ही बिअर बनवू शकता. आत्तापर्यंत तुम्ही 2 मिनिटात मॅगी बनवता येते हे ऐकलं असेल, परंतु आता 2 मिनिटात बियर सुद्धा बनवता येत असल्याने तळीराम नक्कीच खुश होतील. ही बिअर बनवण्यासाठी तुम्ही बिअरची ही पावडर खरेदी करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा घरात बसून बिअर बनवू शकता. विशेष म्हणजे या बिअरमध्ये अल्कहोल नसणार आहे. त्यामुळे शरीराला यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. या वर्षाच्या अखेरीस ही बिअर पावडर बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.