हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशामध्ये सध्या करोनाने हाहाकार माजवून टाकला आहे. रोज लाखो करोना पेशंट वाढत असून, अनेकांचा जीवही जात आहे. अशातच आता अजून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माणसांसोबत आता प्राण्यांनाही करोना होऊ लागल्याची घटना हैदराबादमध्ये समोर आली आहे. हैदराबादमधील नेहरू पार्क पार्कमध्ये असलेल्या आठ सिंहांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
कररोनाने आता माणसांसोबत प्राण्यांनाही लक्ष्य करणे सुरू केले आहे. अमेरिकेमध्ये जगातील सर्वात पहिली केस वाघ आणि सिंह यांच्यामध्ये आढळून आली होती. त्यानंतर आता भारतामध्ये 8 बिबट्या करुणा पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, विषाणू प्राण्यांमध्येही मनुष्य वाहू शकतो यावरून हेच स्पष्ट होत आहे
सध्याच्या घडीला करोणाच्या दुसर्यास स्ट्रेनने मोठी खळबळ उडवून दिली असून, मनुष्याचा जीव वाचणे अवघड होत आहे. अशातच प्राण्यांना ‘या’ विषाणूची लागण झाल्यामुळे मोठी धोक्याची घंटा आता वाजू लागली आहे. कारण प्राण्यांमध्ये हा विषाणू झपाट्याने पसरला तर देशाचे चित्र अजून भयानक असेल. असा तज्ञांनी दावा केला आहे चित्र स्पष्ट केले आहे.