हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Electric Car : सध्याच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. ज्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांची किंमत जास्त असल्याने अजूनही लोकं ते खरेदी करणे टाळत आहेत. हे जाणून घ्या कि, इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीमधील सर्वात जास्त खर्च हा त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरीवर होतो. सध्या, वाहनांमध्ये लिथियम-आयनने बनवलेली बॅटरी वापरली जाते. मात्र आता लवकरच यामध्ये बदल दिसून येणार आहे. चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी असलेल्या JAC कडून सोडियम-आयनने बनवलेल्या कमी किंमतींच्या बॅटरीवर चालणारी जगातील पहिलीच इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या बॅटरीचा वापर करून भविष्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती 10 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतील.
सोडियम-आयन बॅटरीमध्ये स्वस्त कच्चा माल वापरला जातो. यामुळे मुख्य घटक म्हणून लिथियम आणि कोबाल्टवर अवलंबून असलेल्या सध्याच्या तंत्रज्ञानासाठी ईव्ही उत्पादकांना पर्याय मिळेल. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंग-मधील स्टार्टअप कंपनी असलेल्या हिना बॅटरी टेक्नॉलॉजीजने ही बॅटरी विकसित केली आहे. Electric Car
याविषयी देताना हिना बॅटरी टेक्नॉलॉजीजने एका निवेदनात सांगितले की,” या JAC EV मध्ये 25 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी एका चार्जमध्ये 250 किलोमीटरपर्यंतचा पल्ला गाठू शकेल. गेल्या वर्षी लिथियम कार्बोनेटच्या किंमतींत झालेल्या वाढीमुळे अनेक बॅटरी निर्माते आणि ग्राहकांना वाढत्या खर्चाच्या दबावाला सामोरे जावे लागले. म्हणून सोडियम-आयन बॅटरी लिथियम-आयन बॅटर्यांसाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरेल” असेही कंपनीने यावेळी म्हटले आहे. Electric Car
सोडियम-आयन बॅटरीची घनता त्यांच्या लिथियम-आयन समकक्षांपेक्षा कमी असते. या बॅटरीचे लो-टेंपरेचर परफॉरमन्स आणि चार्जिंग स्पीड यासारखे फायदे देखील आहेत. यादरम्यान, आता चीनच्या या इलेक्ट्रिक कार निर्माती BYD परदेशात आपल्या कामाचा विस्तार करत आहे. Electric Car
Nikkei Asia मधील एका रिपोर्ट्सनुसार, 40 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत असलेल्या BYD ने जपान आणि आग्नेय आशिया आणि युरोपमधील देशांमध्ये यावर्षी सुमारे 2 लाख ईव्ही विकण्याची योजना आखली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, BYD ऑटोने जागतिक बाजारपेठेत आघाडीवर राहून 5,37,000 EV युनिट्सची शिपिंग सुरू ठेवली, जी 197 टक्क्यांनी (वर्ष-दर-वर्ष) वाढली आहे. Electric Car
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hinabattery.com/en/
हे पण वाचा :
WhatsApp चे जबरदस्त फीचर, आता आपल्या इमेजेसना स्टिकर्समध्ये बदलू शकतील युझर्स
Bank Holiday : मार्चमध्ये बँका इतके दिवस राहणार बंद, इथे तपासा सुट्ट्यांची लिस्ट
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 50 लाख रुपये
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत संमिश्र कल, तपासा आजचे नवे भाव
Financial Changes : आता बिघडणार आपल्या महिन्याच्या खर्चाचे गणित, 1 मार्चपासून ‘या’ नियमांत होणार बदल