हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना व्हायरस चाचणीसाठी भारत निर्मित पहिल्या किटच्या चाचणीला मान्यता दिली आहे. पुणेस्थित मायलॅबला ही जबाबदारी देण्यात आली आहे. मायलॅबने एका आठवड्यात १ लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले आहे. एका किटमध्ये १०० रूग्णांची तपासणी करता येते, असा कंपनीचा दावा आहे.
पुणेस्थित कंपनी मायलॅबने ६ आठवड्यात ही देशी किट विकसित केली आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दर आठवड्याला १ लाख किट तयार करता येतील. मायलॅब जे किट बनवते त्याची किंमत परदेशातून येणाऱ्या किटच्या पेक्षा चारपट कमी आहे. असे सांगितले जात आहे की प्रत्येक किटद्वारे १०० रूग्णांची तपासणी केली जाऊ शकते. मायलॅब पॅथोडिटेक्ट कोविड -१९ क्वालिटीव्ह पीसीआर किट ही पहिली किट आहे जी व्यावसायिकरित्या मंजूर झाली आहे.या किटला भारतीय एफडीए / केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) ने मान्यता दिली आहे. याव्यतिरिक्त, आयसीएमआर मूल्यांकनात १०० टक्के संवेदनशीलता आणि विशिष्टता प्राप्त करणारी मायलॅब ही एकमेव भारतीय कंपनी आहे.
मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सचे महासंचालक हसमुख रावल म्हणाले, “कोविड -१९ चाचणी किट मेक इन इंडिया अंतर्गत राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने विक्रमी वेळेत विकसित केली गेली आहे. त्याला केंद्रीय फार्मास्युटिकल मानक नियंत्रण संस्थेची मान्यता मिळाली आहे. “हसमुख रावल म्हणाले की, या कठीण काळात आयसीएमआर, एनआयव्ही, बायोटेक्नॉलॉजी उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी) आणि केंद्र व राज्य सरकार मूल्यांकन केंद्र (सीडीएससीओ / एफडीए) कडून मिळालेला आधार कौतुकास्पद आहे.
सध्या प्रति दशलक्ष लोकसंख्येच्या चाचण्यांच्या बाबतीत भारत या यादीत सर्वात शेवटी आहे. या संदर्भात दक्षिण कोरिया, सिंगापूर सारखे देश भारतापेक्षा पुढे आहेत, ज्यांनी चाचणी किट्सच्या सहाय्याने कोरोना विषाणूची प्रकरणे ओळखण्यात आणि प्रतिबंधित करण्यात यश मिळवले आहे.आतापर्यंत भारत सरकार जर्मनीकडून कोट्यावधी चाचणी किट मागवत आहे जेणेकरुन कोरोना विषाणू बाधित रूग्णांची वैद्यकीय तपासणी करता येईल. तथापि, परदेशी किटवरील अवलंबित्व ही त्रासदायक बाब आहे आणि हवाई उड्डाणांवरील निर्बंध परदेशातून चाचणी किट आयात करण्याच्या मार्गात अडथळा आणत आहेत. परंतु आता या चाचणी किटला मान्यता मिळाल्याने अशी अशा आहे कि कोरोना विषाणूच्या संसर्गाचे चित्र बदलेल.