हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो किसान महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. मात्र यातील फक्त 95 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 86 लाख 40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 26 ऑक्टोंबर रोजी म्हणजेच आज प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात नमो किसान महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला 2 हजार रुपये रक्कम देण्यात येते. आज नमो योजनेची पहिली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी मंजुर केला आहे. यापूर्वी पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्याला वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येत होते. मात्र आता नमो योजना सुरू झाल्यामुळे शेतकऱ्याला महिन्याला 12 हजार रुपये मिळणार आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो किसान महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या दोन्ही योजनांची एकूण रक्कम शेतकरयांना 12 हजार रुपये देण्यात येईल. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. तसेच या योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येत आहे.
मुख्य म्हणजे, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचं बटन दाबून योजनेची रक्कम वितरित केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम सोमवारपर्यंत जमा होऊ शकते. त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना खात्यावर पैसे येण्यासाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.