सर्वात मोठी बातमी!! शिवसेनेकडून 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. यात दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज शिवसेना (Shivsena) पक्षाने देखील म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, संजय मंडलीक, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे यांच्यासह 8 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

या नेत्यांना मिळाली संधी

मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे

कोल्हापुर – संजय मंडलीक

शिर्डी (अजा) – सदाशिव लोखंडे

बुलढाणा – प्रतापराव जाधव

हिंगोली – हेमंत पाटील

मावळ – श्रीरंग बारणे

रामटेक (अजा) – राजू पारवे

हातकणंगले – धैर्यशिल माने