हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Lunar Eclipse : भारतीय पंचांगानुसार ग्रहणाचे खास महत्व आहे. ग्रहणाचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असे दोन प्रकार आहेत. ग्रहणाच्या काळात देशातील अनेक ठिकाणी त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूजा केली जाते. यावर्षी म्हणजेच 2023 मध्येही एकूण 4 ग्रहण होणार आहेत, त्यापैकी 2 सूर्यग्रहण तर 2 चंद्रग्रहण असतील. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणाला अशुभ मानले जाते. म्हणूनच या काळात काही कामे करायचे टाळले जाते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दरम्यानचा कालावधी हा सुतक कालावधी म्हणून मानला जातो. तसेच या काळात काही नियमही पाळावे लागतात. ते यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण कधी होणार आणि त्याचा नक्की काय परिणाम होईल त्याबाबतची माहिती जाणून घेऊयात…
या दिवशी असेल यंदाचे पहिले चंद्रग्रहण
हे जाणून घ्या कि, 5 मे 2023 (शुक्रवारी) रोजी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. तसेच, याच्या 15 दिवस आधी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. या 15 दिवसांत 2 ग्रहणांमुळे सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम होईल. वैशाख पौर्णिमेला 5 मे रोजी जे चंद्रग्रहण होते, त्याला बुद्ध पौर्णिमा असेही म्हंटले जाते. जर आपण भारतातील चंद्रग्रहणाच्या वेळेबाबत चर्चा केली तर ते 5 मे रोजी रात्री 8.45 वाजल्यापासून पहाटे 1 वाजेपर्यंत सुरु राहील. यावेळी चंद्रग्रहणाचा कालावधी सुमारे 4 तास 15 मिनिटे इतका असेल. Lunar Eclipse
सुतक काळ लागणार की नाही
या चंद्रग्रहणात सुतक काळ लागणार की नाही याबाबत लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. या वर्षीचे चंद्रग्रहणहे भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचा सुतक काळ पाळला जाणार नाही. सामान्यतः सुतक काळात मंदिरांचे दरवाजे बंदच राहतात. या दरम्यान, काहीही खाणे-पिणे वर्ज असते. विशेषत: गरोदर महिलांना या काळात खास काळजी घेण्यास सांगतले जाते. मात्र, यावेळी कोणत्याही राशींवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. Lunar Eclipse
या ठिकाणी दिसेल चंद्रग्रहण
5 मे रोजी होणारे वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे दक्षिण आणि पश्चिम युरोप, आफ्रिका, हिंद महासागर, अंटार्क्टिका, अटलांटिक, आशियाचा काही भाग आणि पॅसिफिक महासागरात दिसणार आहे. Lunar Eclipse
या दिवशी होईल दुसरे चंद्रग्रहण
हे जाणून घ्या कि, या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जे या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल. तसेच हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्व अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये दिसून येईल. Lunar Eclipse
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, पहा आजचे नवीन भाव
OnePlus चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन बाजारात घालणार धुमाकूळ, तपासा किंमत अन् फीचर्स
Aadhar Card मध्ये फक्त 2 वेळाच बदलता येते ‘ही’ माहिती
BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन, 455 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डाटा
Kotak Mahindra Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदर 50 Bps ने वाढवले