Mumbai Coastal Road: मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पहिल्या टप्प्यामध्ये वरळी ते मारिन ड्राइव्ह या रस्त्याचा समावेश आहे. त्यामुळे आता धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मार्ग म्हणजेच मुंबई कोस्टल रोडचा काही भाग वाहतुकीसाठी (Mumbai Coastal Road) खुला करण्यात आला आहे. या रस्त्याची वशिष्टये काय आहेत हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
- या रस्त्यामुळे वरळी ते मरीन ड्राइव्ह हा रास्ता केवळ १० मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. यापूर्वी (Mumbai Coastal Road) हे आंतर पार करण्यासाठी 40 मिनिटे लागत होती. हा रास्ता १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे.
- सध्या सोमवार ते शुक्रवार असा सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंतच प्रवास करता येईल. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील (Mumbai Coastal Road) कामांना गती देण्यासाठी शनिवारी आणि रविवारी मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
- या मार्गावर सुरक्षा आणि वाहतूक नियमनासाठी शंभरपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत.
- बोगद्यात अग्निप्रतिबंधक उपाययोजनाही केल्या असून बोगद्यांमध्ये वायूविजन प्रणाली आहे. १०० मेगावॉट तीव्रतेच्या (Mumbai Coastal Road) आगीत किमान तीन तास तग धरू शकेल, अशा पद्धतीने या बांधकामाची संपूर्ण रचना आहे.
- हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक इत्यादीही प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रकल्पात (Mumbai Coastal Road) छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळाही उभारण्यात येणार आहे.
- या रस्त्या मुळे ७० टक्के वेळ आणि ३४ टक्के इंधन बचत होणार
- मुंबई महानगर क्षेत्रात कोठेही एका तासात पोहोचता यावे, असे सरकारचे उद्दिष्ट असून यासाठी वर्तुळाकार (Mumbai Coastal Road) महामार्गाची रचना तयार करण्यात येणार आहे.